प्रचिती इंटरनॅशनल स्कूल तर्फे पालकांसाठी विशेष मोफत सेमिनार
साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल तर्फे पालकांसाठी “अभ्यासाच्या सोप्या पद्धती” या विषयावर विशेष मोफत सेमिनाराचे आयोजन करण्यात आले.
हा सेमिनार शनिवार, दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. या सेमिनारसाठी सुप्रसिद्ध The Youngest Trainer व Students Wellness Coach Mr. Samarth Sing यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या वेळी मुलांचा अभ्यास कसा करून घ्यावा, आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवावी, गणित विषयाची भीती कशी दूर करावी, परीक्षेतील ताण कमी करण्याचे मार्ग, अभ्यास लक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धती, स्पीड मॅथ्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
पालकांनी मुलांच्या प्रगतीसाठी आपले योगदान कसे द्यावे व विद्यार्थ्यांच्या विश्वासावर आधारित पालक–विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध कसे दृढ करावेत याबाबतही उपयुक्त टिप्स देण्यात आल्या. यशस्वीपणे आयोजन करण्यात शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील, प्राचार्या सौ. वैशाली लाडे व शिक्षकवर्ग यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमात फक्त ४ थी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सहभाग घेण्यात आला. या कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता नेरकर यांनी उत्तम रित्या पार पाडले. समन्वयक श्री. वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांनी सुद्धा पालकांशी संवाद साधला त्यानंतर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.