साक्री : तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक स्पर्धांमध्ये
प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या मेहनतीचे आणि शाळेतील क्रीडा संस्कारांचे द्योतक आहे. शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील सर,
प्राचार्य सौ. वैशाली लाडे मॅडम व क्रीडा शिक्षक श्री. वैभव सोनवणे व श्री. कुणाल देवरे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. समन्वयक श्री. वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
100 मीटर धावणे, ११० मीटर हर्ड धावणे, २०० मीटर धावणे, उंची उडी, भालाफेक आदी स्पर्धांमध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर ज्युनिअरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
विजेते विद्यार्थी:
l तान्या वारुसंगे (इयत्ता आठवी) – 14 वर्षे वयोगट, 100 मीटर धावणे – प्रथम क्रमांक
l समीक्षा चव्हाण (इयत्ता नववी) – 17 वर्षे वयोगट, 110 मीटर हर्डल धावणे – प्रथम क्रमांक
l वेदाक्ष कुलकर्णी (इयत्ता नववी) – 17 वर्षे वयोगट, 200 मीटर धावणे – प्रथम क्रमांक
l अजित साळुंखे (इयत्ता दहावी) – 17 वर्षे वयोगट, 110 मीटर धावणे – प्रथम क्रमांक
l सिद्धांत पाटील (इयत्ता आठवी) – 14 वर्षे वयोगट, उंच उडी – प्रथम क्रमांक
l सोहम साळुंखे (इयत्ता आठवी) – 14 वर्षे वयोगट, 80 मीटर हर्डल धावणे – प्रथम क्रमांक
l युगंधरा ठाकरे (इयत्ता नववी) – 17 वर्षे वयोगट, भालाफेक – प्रथम क्रमांक
l युगंधर ठाकरे (इयत्ता नववी) – 14 वर्षे वयोगट, 100 मीटर धावणे – प्रथम क्रमांक