प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये टपाल दिवस साजरा
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, साक्री येथे “टपाल दिवस” अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे इन्चार्ज श्रावण अहिरे सर होते. सौ. ज्योती नांद्रे यांनी या कार्यक्रमाचे उत्तमरित्या सूत्रसंचालन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना टपाल सेवांचे महत्त्व आणि त्यामागील परंपरा याविषयी प्रेरणादायी माहिती दिली.
शाळेचे चेअरमन प्रशांत भीमराव पाटील यांनी शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसेच आजच्या डिजिटल युगातही पत्रलेखनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना टपाल कार्यालयाची कार्यपद्धती व विविध सेवांविषयी माहिती दिली.
समन्वयक तुषार देवरे व वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित पत्रलेखन स्पर्धेत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांना पोस्टमनचे प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पत्राचे सामाजिक आणि भावनिक महत्त्व समजावून सांगण्यात आले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.