प्रचिती पब्लिक स्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
शाळेचे संस्थापक मा.प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन वैशाली वाघ यांनी केले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी वैभवी पाटील, आराध्य पाटील, निर्वेद पाटील ,चैतन बच्छाव, आदित्य एखंडे, मृणाली शिंदे,कार्तिक खैरनार, चैताली भदाणे, पुष्कर पवार, करण चौधरी, पर्व खैरनार यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच l.kg चे विद्यार्थी तेज कोठावदे , विहान सूर्यवंशी यांनी महात्मा गांधी यांची वेश भूषा व U.k.g चा विद्यार्थी कार्तिक जगताप याने लाल बहादूर शास्त्री यांची वेशभूषा केली. त्यानंतर वैशाली जगताप यांनी लाल बहादूर शास्त्री आणि गांधीजी यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मत व्यक्त केले.
“एक थे लाल और एक थे बापू दोनो मे था अलग सा जादू ” “लालाजी बोला जय जवान और जय किसान बापू बोले रघुपती राघव राजाराम” “देश का सुख था उनका सपना कर दिया जीवन साकार अपना”
या शब्दात त्यांनी मत व्यक्त केले. तसेच शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांनी गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल माहिती दिली .
गांधीजींच्या “अहिंसा व सत्य” या विचारांसोबत शास्त्रीजींचे “जय जवान, जय किसान” हे घोषवाक्य विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात प्रतिध्वनित केले. संपूर्ण कार्यक्रम वातावरण प्रेरणादायी व राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला. तसेच शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ” स्वच्छ भारत ,सुंदर भारत” एकच निर्धार करूया, प्लास्टिकचा वापर टाळूया” अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी भारत स्वच्छता अभियानाचा अनमोल संदेश दिला. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आजच्या कार्यक्रमासाठी सरिता अहिरे,प्रेरणा नांद्रे यांनी फलक लेखन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ ५वी मधील विद्यार्थ्यांनी हर्ष खैरनार, पुष्कर पाटील यांनी केले. व त्यांना मार्गदर्शन योजना जाधव यांनी केले. फोटोग्राफी इंदिरा चित्ते यांनी केले. शाळेचे शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच कार्यक्रमाची सांगता इ ७ वी विद्यार्थिनी अनुष्का अहिराव यांनी केली.