



पिंपळनेर : दि. १६ ऑगस्ट रोजी प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये जन्माष्टमी निमित्त गोपालकाला मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. जन्माष्टमीच्या निमित्ताने प्रचिती पब्लिक स्कूल मध्ये माननीय चेअरमन प्रशांत भीमराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, फुलांच्या तोरणांनी व आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता.
“विसरून सारे मतभेद लोभ- अहंकार सोडा रे सर्वधर्म समभाव जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा रे ,दहीहंडीच्या शुभेच्छा”
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण यांच्या पूजनाने करण्यात आली शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील सरांनी गोपालकाला विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील मॅम यांनी विद्यार्थ्यांना कृष्णजन्माष्टमी ची कथा सांगितली गोपालकाला विषयी माहिती सायली मॅडम यांनी सांगितली
कार्यक्रमाची प्रमुख जबाबदारी दिव्या मॅडम यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण देवरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तनुश्री पगारे, देवयानी शेवाळे यांनी केले . फलक लेखन सजावट सुनिता मॅडम मॅडम व शितल मॅडम यांनी केली.
बॅनर सजावट सरिता मॅडम, अश्विनी मॅडम, योजना मॅडम व प्रेरणा मॅडम यांनी केली. हांडी सजावट अर्चना देसले मॅडम यांनी आकर्षक पद्धतीने केली. पालना सजावट मयुरी मॅडम व वैशाली जगताप मॅडम यांनी केली.




छायाचित्र प्रतिक्षा मॅडम यांनी काढले, तर व्हिडिओ प्रेरणा मॅडम यांनी चित्रित केला. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनही किरण मॅडम यांच्या मार्गदर्शनाने प्रांजल सूर्यवंशी केले
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या उत्सवातून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातून शिकण्यासारखे धडे – जसे की प्रामाणिकपणा, मैत्रीभाव, एकत्रितपणा व दुष्टावर विजय – यांचा संदेश मिळाला. सर्व विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर ठेका धरून नृत्य केले.
शाळेच्या वतीने सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
श्रीकृष्णाच्या बाललीला व दहीहंडीवरील कथा रंगल्या
विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात जोशात सहभाग घेतला. १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णावर आधारित सुंदर गाणी व गवळणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला व दहीहंडीवरील कथा रंगवून सांगितल्या. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण वैशाली मॅडम, जागृती मॅडम यांनी केले. दहीहंडी फोडण्याचा क्षण अतिशय थरारक ठरला. “गोविंदा आला रे”च्या गजरात विद्यार्थ्यांनी मानवी पिरॅमिड रचून दहीहंडी फोडली. हांडी फुटताच ताक, चॉकलेट मुरमुरे,लोणी व फुलांचा वर्षाव झाला आणि संपूर्ण शाळा आनंदात दुमदुमली.



















