प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘रेड डे’ उत्साहात साजरा
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे “रेड डे ” जल्लोषात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे पोशाख परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. विविध उपक्रम, गाणी, कवितांचे सादरीकरण व नृत्य यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे महत्त्व मांडले. या कार्यक्रमाचे इन्चार्ज सौ. हिरल सोनवणे यांनी नियोजन केले.
शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्राचार्य सौ. वैशाली लाडे यांचे नेतृत्व तर समन्वयक श्री. वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत उत्साहात झालेल्या या कार्यक्रमात मुलांच्या आनंदी चेहऱ्यांनी “रेड डे” साजरा करण्याचा उत्साह अधिक खुलविला.