प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये पोएट्री कॉम्पिटिशन उत्साहात
साक्री : प्रचिती पब्लिक स्कूल , पिंपळनेर मध्ये दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी Poetry Competition मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत नर्सरी, एल के जी व यु के जी च्या लहानग्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भिमराव पाटील यांच्या मार्गद्शनाखाली स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनीता पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत झाले.
लहान मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीला शब्दांची सुंदर साथ देत मनमोहक कविता सादर केल्या आणि उपस्थितांचे मन जिंकले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्य विकसित होण्यास मदत झाली. स्पर्धेचे सर्वत्र कौतुक झाले.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे झालेली ही Poetry Competition आनंद, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.