प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी दिवसाचा उत्साह
साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवसाचे औचित्य मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दल जागृती निर्माण करून तिचा गौरव वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे इन्चार्ज सौ. वैशाली खैरनार व सौ. पूजा जोहरी नियोजन करून कार्यक्रमाला विशेष रूप दिले.
या प्रसंगी नर्सरी ते आठवी इयत्तेपर्यंत हिंदी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत लहानग्या विद्यार्थ्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सुंदर, शुद्ध व स्वच्छ हस्ताक्षरातून हिंदी भाषेची सौंदर्यपूर्ण मांडणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.हेमांगी बोरसे यांनी केले. सौ सुनीता पाटील यांनी कविता सुंदर कविता सादर केली.
सौ.पूजा जोहरी यांनी उत्कृष्ट असे भाषण सादर केले.
या कार्यक्रमात प्रसंगी आराध्या संदीप ठाकरे, वैभव प्रशांत पाटील, लोकेश भामरे, तन्वी सोनवणे ,गौरवी सोनवणे या सर्व विद्यार्थ्यांनी हिंदी विषयावर दोन शब्द व कविता सादर केल्या.
आदरणीय चेअरमन श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देत हिंदी ही केवळ राजभाषा नसून आपल्या संस्कृतीची ओळख असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेबरोबरच हिंदी भाषेचा अभिमान बाळगण्याचे व तिचा दैनंदिन वापर वाढविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम प्राचार्य सौ. वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
हिंदी दिवसाच्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना “हिंदी ही राष्ट्राची ओळख व एकतेची भाषा आहे” हा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला. शाळेच्या परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पसरले होते.