प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
साक्री येथे दिवाळी उत्सव उत्साहात साजरा
ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीचा उज्ज्वल संगम

साक्री (प्रतिनिधी) : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे दिवाळीचा सोहळा आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक रंगतदार वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिवाळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व उलगडणारे विविध कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाचे इन्चार्ज सौ. वैष्णवी देवरे, सौ. तेजस्विनी घरटे, सौ. हिरल सोनवणे, सौ. प्रभावती चौधरी, श्री. प्रफुल साळुंखे आणि श्री. गणेश नांद्रे यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
सूत्रसंचालन श्री. वैभव जोशी आणि श्री. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने केले. शाळेची सजावट लक्षवेधी ठरली. डेकोरेशन इनचार्ज सौ. दीपमाला अहिरराव, सौ. पूजा जोहरी, श्री. भूपेंद्र साळुंखे, श्री. पियुष बागुल आणि श्री. जितेंद्र कासार यांनी विद्यार्थ्यांसोबत शाळेचा परिसर आकर्षकपणे सजवला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या आकाशकंदीलांचा वापर करून पूर्ण परिसर सजवला, तसेच झेंडूच्या फुलांच्या आरास व सुंदर रांगोळ्यांनी वातावरण भारावून गेले. सौ. सविता लाडे आणि सौ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी साकारली. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र पथक तयार करून त्या दिवसाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर आधारित नाटिका श्रीमती सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आल्या. श्रीमती हर्षदा गांगुर्डे, सौ.सुनिता पाटील, सौ.सुनिता सुर्यवंशी, सौ. ज्योती नांद्रे, श्रीमती हेमांगी गवांदे या सर्व शिक्षकांनी अनुक्रमे दिवाळीच्या पाचही दिवसांची माहिती सांगितली.
सामाजिक जाणीव आणि संस्कारांचा अनोखा उपक्रमदरवर्षीप्रमाणे यंदाही गरजूंना कपडे वाटप व फराळ वाटपाचा सामाजिक उपक्रम सौ. स्मिता नेरकर व श्री. धर्मराज अहिरे श्री. राजरत्न सोनवणे ,श्री प्रथमेश सोनवणे श्रीमती जागृती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. हा उपक्रम साक्री व कावठे या गावांमध्ये वेगवेगळे पथक तयार करून स्वतः चेअरमन सरांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना “आपण दिवाळीचे वाटप का करतो?” यामागील खरा हेतू समजावून सांगण्यात आला.
चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की —“आपण शिकले पाहिजे, कारण शिक्षणच आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवते. आपण आपल्या पालकांकडे हात पसरवू नये, तर त्यांच्या हाताला आधार द्यावा — हाच खरा आनंद आहे. आणि जेव्हा आपण समाजातील गरजू लोकांसोबत दिवाळी साजरी करतो, तेव्हा मिळणारा तो आनंद अनमोल असतो.”
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये परिस्थितीची जाणीव, सामाजिक संवेदना, सहकार्य आणि करुणेचा संस्कार वृद्धिंगत झाला. सौ. वैशाली खैरनार आणि सौ. हेमांगी बोरसे यांनी इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या भूमिका साकारून “रामप्रती परतण्याचा” प्रसंग सादर केला, तर सौ. रोहिणी अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या नृत्याविष्काराने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
शाळेच्या प्रवेशद्वारावर स्नेहा साळवे, श्री. तुषार सूर्यवंशी आणि श्री. कुणाल देवरे सव्वा अश्विनी खैरनार यांनी दिव्यांच्या साह्याने “शुभ दीपावली” हे सुंदर अक्षररूप सजावट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्राचार्या सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. तुषार देवरे आणि श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
संपूर्ण कार्यक्रमातील सुंदर असे छायाचित्रे काढण्याचे काम श्रीमती अश्विनी ठाकरे व श्रीमती नम्रता गोसावी यांनी केले. दिवाळीच्या या सोहळ्याने प्रचिती परिवारात आनंद, संस्कार आणि एकतेचा उज्ज्वल प्रकाश पसरला.















