पिंपळनेर: रंगाचा सण म्हणून ओळखला जाणारा होळी सण दोन दिवसांवर येऊन ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मोठया उत्साही वातावरणात होळीचे रंग उधळून धुलीवंदन सण साजरा केला. विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावत मैत्रीचा आनंद लुटला. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी, मुख्याध्यापिका अनिता पाटील, समन्वयक राहूल पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सहभागी होवून आनंद द्विगुणी केला.
रंग उधळत असताना सेल्फी घेण्याचा मोह विद्यार्थ्यांना अवरता आला नाही. विद्यार्थ्यांनी स्कूलच्या आवारात मोठ्या आनंदाने रंग उधळले. रंगपंचमीला वापरात येणारे रासायणिक रंग त्वचा आणि आरोग्यासाठीही घातक आहेत. त्यानुषंगाने, विद्यार्थ्यांनी वसंत ऋतुत बहरणाऱ्या विविध पाने आणि फुलांपासुन नैसर्गिक रंग बनवून पर्यावरणपुरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश दिला.
होळीच्या पुर्वी वसंत ऋतुमध्ये पळस ही वनस्पती फुलून लाल, केशरी व पिवळया रंगाची उधळण करीत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. निसर्गातील हा सुचक आपसुकच मानवालाही पर्यावरणपुरक रंगांचा वापर करण्याचा संदेश देतो.