साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथील विद्यार्थी सिद्धांत संदीप पाटील याची प्रतिष्ठित स्पिरिट ऑफ ग्रासरूट क्रिकेट लीग (एसजीसीएल) मध्ये उदयोन्मुख खेळाडू (Emerging Player) म्हणून निवड झाली असून त्याला तब्बल ₹५१,००० रुपयांत मुंबई संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. सिद्धांतच्या या उल्लेखनीय यशामुळे प्रचिती परिवारासह संपूर्ण साक्री तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेत न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेसी रायडर, झिम्बाब्वेचे ख्रिस्तोफर म्पोफू, तसेच रणजी क्रिकेटपटू चेतन देसाई, विनीत बन्सल, धीरन पटेल यांच्यासह अनेक नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, सिद्धांत हा या स्पर्धेतील सर्वात कमी वयाच्या उदयोन्मुख खेळाडूंमध्ये गणला जात असून त्याच्या निवडीमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला नवे दालन खुले झाले आहे.
या यशाबद्दल प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, साक्री चे चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी सिद्धांतचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनीही त्याच्या मेहनतीचे व चिकाटीचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी सिद्धांतच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री तसेच धुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सिद्धांत पाटील याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रचिती परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्रीच्या विद्यार्थ्याची एसजीसीएल प्रो. लीगमध्ये दमदार निवड





















