साक्री : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रचिती इंटरनॅशनल School अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे विशेष योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी महंत श्री योगीनाथ दीनानाथ जी महाराज हे प्रमुख पाहुणे व योगगुरु म्हणून उपस्थित होते. योगीनाथ दीनानाथ जी महाराज यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाच्या पद्धतींचे मार्गदर्शन केले. त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व पटवून देत निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रशांत भीमराव पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायाम यांचे महत्त्व पटवून दिले, प्राचार्या सौ. वैशाली लाडे , समन्वयक श्री वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे योगाभ्यासात सहभाग घेतला. विविध योगासने व प्राणायामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. संपूर्ण शाळा परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना निरोगी, सुदृढ व सकारात्मक जीवनाचा संदेश देण्यात आला.























