प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारी चित्रकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेचे नियोजन व आयोजन श्री. निखिल गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरीत्या करण्यात आले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी निसर्ग, पर्यावरण, सामाजिक विषय तसेच कल्पनाशक्तीवर आधारित आकर्षक चित्रे साकारून आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागतो, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक श्री. राहुल अहिरे सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी प्रचिती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. त्यांच्या सहकार्याबद्दल शाळा परिवाराने मनःपूर्वक आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





















