आज दिनांक ३ जून २०२६, वार बुधवार रोजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे नवीन उमेद, उत्साह व आनंदाच्या वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.
“विद्यालय वह स्थान है जहाँ सपनों को उड़ान मिलती है।
ज्ञान वह शक्ति है जो जीवन को सफलता की ओर ले जाती है।”
विद्यार्थ्यांचे आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट, सुंदर रांगोळी व स्वागत फलकामुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता सरस्वतीचे पूजन करून करण्यात आली. या पूजनामुळे कार्यक्रमाला पावित्र्यपूर्ण व मंगलमय सुरुवात लाभली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, उपक्रम व स्वागतपर अॅक्टिव्हिटी आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉईंटजवळ फोटो घेतले तसेच वेलकम बॅनर व सेल्फी फ्रेमजवळ छायाचित्रे काढून पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सुंदर आठवणी जपण्याची संधी मिळाली.या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे संस्थापक आदरणीय प्रशांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन किरण देवरे मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. शाळेचे समन्वयक श्री. राहुल अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच अनीता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती, वेळेचे महत्त्व, नीटनेटकेपणा व अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी नियोजनबद्ध व जबाबदारीने आपापली कामे पार पाडली. व्हिडिओ ची जबाबदारी शीतल मॅडम यांनी सांभाळली व छायाचित्रणाची जजबाबदारी मयुरी मॅडम यांनी सांभाळली. बॅनर, बोर्ड व सजावटीचे काम पवार सर, अाश्विनी मॅडम, अर्चना मॅडम, अनीता मॅडम व मयुरी मॅडम यांनी केले. सुंदर अशा रांगोळी सजावटीचे काम प्रेरणा मॅडम व दिव्या मॅडम यांनी केले.
सेल्फी बॅनर, फ्लॉवर बुके तसेच इतर आकर्षक सजावटीची कामे दिल्या प्रेरणा मॅडम, अर्चना मॅडम, मोरे सर, शीतल शिंपी मॅडम, योजना मॅडम व सुनीता मॅडम यांनी करून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर सेल्फी पॉईंटसाठी सुनीता मॅडम यांनी अत्यंत सुंदर बुके तयार केले. तसेच अर्चना मॅडम व सरिता मॅडम यांनी आकर्षक भिंगऱ्या तयार केल्या. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध गेम्स, स्पर्धा व अॅक्टिव्हिटीजचे आयोजन सर्व शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पहिल्या दिवसाचा आनंद लुटला. अशा प्रकारे प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथील शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदाने, उत्साहाने व अविस्मरणीय वातावरणात पार पडला.
















