पिंपरी : खान्देश मराठा पाटील समाज संघाच्यावतीने युवा आर्किटेक्चर मयूर पाटील यांचा वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आकुर्डी येथील खंडोबामाळ, सभागृहात नुकत्याच झालेल्या समाजाच्या वर्धापनदिनानिमीत्त मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त निलेश भदाणे होते. प्रमुख पाहुणे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, मा. नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शारदा सोनवणे, शेखर चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, पाटील बुवा चिंचवडे, दै. सकाळच्या संपादिका शितल पवार, उद्योजक दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
मयूर पाटील यांनी कमी वयातच आर्किटेक्चरच्या क्षेत्रात स्वतःचं एक विशेष स्थान निर्माण केल आहे. त्यांचं योगदान आणि समर्पण कार्यक्षेत्रात सध्याच्या पीढीला प्रेरणा देतं. भविष्यातील आर्किटेक्चरला एक नवीन परिप्रेक्ष्य देतं. आपल्या कौशल्याचं आणि कल्पनाशीलतेचा उपयोग ते पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक इमारतीत, संग्रहालयांत, आणि विशेषत: शिल्पगृहात करीत आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रात एक विशिष्ट स्थान मिळवलं आहे. शिक्षण महर्षी पुरस्कार प्राप्त श्री.प्रशांत पाटील यांच्याकडून आपल्या क्षेत्रात कामाच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन घेत असल्याचे ते सांगतात.