साक्री: प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज, दि. ५ एप्रिल रोजी नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शाळेतील पहिला दिवस हा आठवणीतील दिवस म्हणून स्मरणात राहावा. तसेच शाळेविषयी त्यांची अभिरुची वाढावी. या दृष्टिकोनातून संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे व सर्व शिक्षकांनी सर्व प्रथम नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे फीत कापून स्वागत केले. तसेच, औक्षण करून विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षकांनी वेलकम नृत्य प्रदर्शित केले. एलकेजी व युकेजीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत समारंभासाठी नृत्य प्रदर्शन केले. यासाठी वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपापल्या वर्गातील मुलांचे सेल्फी बॅनर येथे स्वागत केले. या कार्यक्रमाचे संयोजन सपना देवरे, गणेश नांद्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सेल्फी बॅनर व सुंदर फलक लेखन भूपेंद्र साळुंखे, दीपमाला मॅम यांनी केले. यावेळी, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग,वाहन चालक वर्ग उपस्थित होते.