साक्री: प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच “ग्रॅज्युएशन डे” मोठया उत्साहात पार पडला. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नरेंद्र सोनवणे, रुपेश राणे, संतोष वाघमोडे, शुभांगी भंडारी, मोनाली वाघमोडे, प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
“ग्रॅज्युएशन डे ” निमित्त माहिती देताना प्रमुख पाहुणे म्हणाले की, ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीधर. नर्सरी, एलकेजी, युकेजी या तीन वर्गांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पदवीस ग्रॅज्युएशन डे म्हटले जाते. नर्सरी मध्ये विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो. तेव्हा त्याला शिक्षक म्हणजे काय हे माहीत नसते. पुस्तक, पेन्सिल याविषयी त्याला कोणतीही माहिती नसते. परंतु हळूहळू त्यास शाळेविषयी गोडी निर्माण होते. नर्सरी चा विद्यार्थी आईचा लाडका असतो. परंतु शाळेत आल्यावर त्याला शिस्तीचे वळण लागते. सुरुवातीला विद्यार्थी शिक्षिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही. परंतु, शिक्षिका व विद्यार्थी यातील अंतर हळूहळू कमी होत जाते. शिक्षिका जसे सांगतील, त्या क्रिया म्हणजेच विद्यार्थी बोलण्यास वाचण्यास लिहिण्यास शिकतो. विद्यार्थी शाळेत शिकण्याबरोबरच खेळण्यास व मस्ती करण्यासही विद्यार्थी प्रवृत्त होतो. अशा प्रकारे तीन वर्षात विद्यार्थी पदवीधर होतो, असे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी हीरल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर पत्र वाचून दाखविले. पत्रातून विद्यार्थ्यांविषयीचे अनुभव व प्रेम व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी ” ग्रॅज्युएशन डे ” निमित्त माहिती देताना सांगितले की, 1980 – 90 च्या काळात पहिले बीए चे शिक्षण पूर्ण झाल्यावर पदवीधर ही पदवी प्राप्त होत असे. परंतु प्रचिती इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नर्सरी, एलकेजी, युकेजी या तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ही पदवी प्राप्त होते. ” ग्रॅज्युएशन डे ” विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व त्याचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस असून भविष्यात या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल करावे, असे मनोगत व्यक्त केले. तसेच शुभांगी भंडारी यांनी “ग्रॅज्युएशन डे” बद्दल माहिती दिली. “ग्रॅज्युएशन डे ” निमित्ताने विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढतो. त्यांच्या आई-वडिलांना आपल्या चिमुकल्या बालकांनी शाळेत वेळेवर जाऊन श्रवण, वाचन, लेखन या क्रिया आत्मसात केल्या याचा आनंद होतो. यापुढेही त्यांनी आपले शिक्षण उत्तम प्रकारे प्राप्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी यु के जीच्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी नरेंद्र सोनवणे, रुपेश राणे, शुभांगी वाघमोडे, प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे व शाळेच्या शिक्षिका यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी ” ये जिंदगी मेरी ” या गाण्यावर यु.के.जी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. या नृत्याचे मार्गदर्शन दीपमाला अहिरराव मॅम, पूनम पवार, मानसी माळी यांनी केले. शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना ” ग्रॅज्युएशन डे” च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सुंदर फलक लेखन व डेकोरेशन याचे हीरल सोनवणे, भूपेंद्र साळुंके, कांचन साळुंके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता पाटील, नम्रता भदाणे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन हिरल सोनवणे, कांचन साळुंके यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.