पिंपळनेर : येथील नावलौकिक अशा प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये दि. २२ एप्रिल रोजी “ग्रॅज्युएशन डे” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा खैरनार, तनुजा शिंदे होत्या. तसेच, शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अनिता पाटील, अर्चना देसले यांनी केला. सिनियर केजी च्या वर्गात विद्यार्थी पाच वर्षाचे असतात. या वयाच्या विद्यार्थ्यांना खेळण्याची आवड असते. परंतु खेळासह अभ्यास देखील तितकाच महत्वाचा असतो.
सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना नर्सरी ते सिनियर केजी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले याबद्दल त्यांना गौरविण्यात येते. पूर्व प्राथमिक शिक्षणामधून प्राथमिक शिक्षणात प्रवेश केल्यामुळे त्यांना पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनात सहभाग झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. या प्रसंगी सिनिअर केजी च्या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद होता. यासह विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता जाधव यांनी केले. अनिता पाटील यांच्यासह शिक्षिकांनी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणांसाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी, इयत्ता 2 री व ३ रीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी व फलक लेखन करण्यात आले. मोठया आनंदाने ‘ग्रॅज्युएशन डे’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता समारंभ अर्चना देसले यांनी केली.