पिंपरी :- अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देत तरूणांनी पुणे ते हंपी सायकल यात्रा पूर्ण केली आहे. पुणे ते हंपी हा ६०० किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत पार केला आहे. या सायकल यात्रेमध्ये नितीन सिरसाट, राहुल शिंदे, सतीश सावंत आणि संदेश गाडे हे सायकलपटू सहभागी झाले होते.
ही यात्रा दि.२८ डिसेंबरला पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथून सुरु झाली होती. पहिल्या दिवशी पुणे ते मोहोळ २३० किलो मीटरचा प्रवास झाला. दुसऱ्या दिवशी मोहोड ते अलमट्टी धरण हा २११ किलो मीटर आणि तिसऱ्या दिवशी अलमट्टी धरण ते हंपी या ऐतिहासिक शहरापर्यंत १५१ किलो मीटरचे अंतर पार केले. यात्रे दरम्यान या सायकलपटूंनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश प्रत्येक गावा गावामध्ये आणि शहरामध्ये दिला.