पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उपक्रम
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोगस डॉक्टरांना चाप बसविण्यासाठी महापालिकेतर्फे शोध मोहीम चालू करण्यात आली असून, यामध्ये नागरिकांनाही सहभागी करण्यात आले आहे, ज्यामध्ये नागरिकांना व्हॉटस अॅपद्वारे तुमच्या भागातील बोगस डॉक्टर कळवू शकता.
पिंपरी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये महापालिकेने नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन केले आहे. ज्यामध्ये नागरिकांना 9922501118 या क्रमांकावर व्हॉटस अॅपद्वारे बोगस डॉक्टरचे नाव, पत्ता, ज्या ठिकाणी व्यवसाय करण्यात येत आहे. त्या जागेचा फोटो पाठवता येणार आहे. संबंधित डॉक्टरची चौकशी केल्यानंतर डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.