पिंपरी – मिळकतकर विभागाने 15 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे जुन्या 500 च्या नोटद्वारे 15 डिसेंबरपर्यंत महापालिकेचे कर भरता येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची बँकामध्ये सर्वाधिक गर्दी पाहण्यास मिळाली. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना मिळकतकर स्वीकारताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 10 ते 24 नोव्हेंबर या दरम्यान नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले.
या कालावधीत कोट्यावधी रुपयांचा मिळकतकर नागरिकांनी महापालिकेच्या तिजोरीत जमा केला. त्यामुळे कर भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली.
नोटा बंदीच्या निर्णयानंतर 500 आणि 1000 च्या नोटा महापालिकेने स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतर पंधरा दिवसात 145 कोटी 36 लाखांचा मिळकतकर नागरिकांनी जमा केला. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर कर जमा झाला. राज्य सरकारने 15 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या नोटा मिळकतकर विभागाने स्वीकारावे अशा स्वरूपाचे आदेश राज्य सरकारने महापालिकांना दिले आहेत.