पिंपरी :- पोलीस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशनच्या चाकण शाखेच्या नामफलकाचे खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणारे भारतीय जवान आणि देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस बांधव यांच्याप्रती समाजामध्ये आस्था व आपुलकी वाटावी यासाठी पोलीस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशन कार्यरत असल्याचे संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे यांनी सांगितले.
पोलीस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशन पोलीसांसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे खेड – आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान संचालक राजगुरूनगर सहकारी बँक किरणशेठ मांजरे, मा.उपनगराध्यक्ष, मा.सभापती, चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक धीरज शेठ मुटके, चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राम गोरे, पंचायत समिती खेड तालुकाचे मा. उपसभापती सतिष राक्षे, मेदनकर वाडीचे सरपंच अमोल साळवे, मेदनकर वाडीचे ग्रामपंचायत सदस्य संदिप मेदनकर, जिल्हा परिषद केंद्र प्रमुख रामदास लाड, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, उपाध्यक्ष कमलजित सिंग, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कार्तिक गोवर्धन, खेड आळंदी विधानसभेचे उपाध्यक्ष राहूल सोरटे, सचिव संदिप साबळे, चाकण शहर कार्याध्यक्ष संकेत कड, चाकण शहर सचिव रमेश लोणारी, चाकण शहर संपर्क प्रमुख राजेंद्र लोणारी, आर्यन लाड, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर, उद्योजक सचिन मांजरे, उद्योजक स्वप्निल मुटके, मंगेश साठे, संत तुकाराम नगर शाखा अध्याक्ष केशव त्रिभुवन, उपाध्यक्ष रविकांत सागवेकर आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका उपाध्यक्ष मुचकुंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. खेड आळंदी विधानसभेचे अध्यक्ष संग्राम लाड यांनी आभार व्यक्त केले.