मतदान केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
पुणे : जिल्ह्यातील २०५-चिचवड विधानसभा मतदारसंघ व २१५-कसबा विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ५१० आणि २१५- कसबा विधानसभा मतदारसंघातील २७० मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे.
या मतदान केंद्रांची यादी http://pune.nic.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध असून त्याच्या प्रती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात व संबंधित मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कळविले आहे.