‘अॅग्रोवर्ल्ड’तर्फे आरोजन : तीन वैयक्तिक पुरस्कार प्रदान
धुळे : येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजीत अँग्रोवर्ल्डच्या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात जलयुक्त शिवारांतर्गत 12 पाणीदार गावे तसेच संबंधित कृषी सहायक तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तीन वैयक्तिक पुरस्कारांचेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
नंदुरबार वसुंधरा पाणलोटचे उपप्रकल्प व्यवस्थापक आर. एस. महाले, तालुका कृषी अधिकारी श्री. घागरे, कृषी अधिकारी के. पी. देवरे तसेच रमेश पोतदार, पी. व्ही. निकम, अग्रोवर्ल्डचे शैलेंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते.
गुणवंत अधिकारी पुरस्काराने आर. डी. पाटील यांना कृषी उद्योजक म्हणून डॉ. स्वप्नील बच्छाव व राजेंद्र पाटील यांना सन्मानीत करण्यात आले. या प्रदर्शनात औषधी वनस्पतींची रोपे, नर्सरी उपयुक्त तंत्रज्ञान, काटेकोर सिंचन, यांत्रिक दालन, सुबाभूळ करार शेती यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले होते. नवतंत्रज्ञान, प्रात्यक्षिक पाहण्यास शेतकऱ्यांची गर्दी झाली होती.