पिंपरी विधानसभा मधील आठ प्रभागांच्या बुधवारी मुलाखती
पिंपरी (दि. 03 जानेवारी 2017) फेब्रुवारी महिन्यात होणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळवू इच्छिणा-यांच्या मुलाखतीचे वेळापत्रक पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
त्यानुसार पिंपरी विधानसभा मतदार संघात येणा-या एकूण आठ प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी (दि. 4 जानेवारी) सकाळी साडेदहा वाजल्यापासून पिंपरी संत तुकारामनगर येथील बॅडमींटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत. या वेळी कार्ड कमिटीचे सदस्य पालकमंत्री गिरीष बापट, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे, प्रदेश भाजपा सचिव उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, एकनाथ पवार, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, बाबू नायर, प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, अमोल थोरात, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, ॲड. अमर मुलचंदानी, वसंत वाणी, युवा मोर्चा शहराध्यक्ष रवी लांडगे, महिला मोर्चा शहराध्यक्षा शैला मोळक, अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष मनोज तोरडमल आदी उपस्थित राहणार आहेत.
मुलाखतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे : प्रभाग क्र. दहा (शाहूनगर / मोरवाडी) सकाळी साडेदहा वाजता ;  पभाग क्र. चौदा (काळभोरनगर / दत्तवाडी/ चिंचवड स्टेशन) सकाळी साडेअकरा वाजता ; प्रभाग क्र. पंधरा (आकुर्डी गावठाण / प्राधिकरण) सकाळी साडेबारा वाजता ; प्रभाग क्र. वीस (संत तुकारामनगर / विशाल थिएटर) दुपारी दोन वाजता ;  प्रभाग क्र. एकोणीस ( उद्यमनगर / भाटनगर) दुपारी साडेतीन वाजता ; प्रभाग क्र. एकवीस (जिजामाता हॉस्पिटल / पिंपरीगाव)  सायंकाळी पाच वाजता ; प्रभाग क्र. तीस (दापोडी/ कासारवाडी) सायंकाळी सहा वाजता ; प्रभाग क्र. 9 (विठ्ठलवाडी / वास्तू उद्योग / खराळवाडी) सायंकाळी सात वाजता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here