पिंपरी, दि. ०७ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा गौरव महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, नगरसदस्य अनंत को-हाळे, नगरसदस्या विमल जगताप, क्रीडा अधिकारी रजाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक, राजू कोतवाल, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, प्रविण बागलाणे, आकाश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सत्कारार्थींमध्ये चंद्रशेखर कदम, महेश कोंडिबा कुडले, शाकीर शेख, इनायत शेख, सुशील भोसले, सीमा कुलकर्णी, चेतन शिवाजी मुठाळ, प्रथम प्राग भुजबळ, वेदांत विजय भरेकर, आफताब शिकलगार, ऋषिकेश सोनावले, सोहम उजगावकर, अर्ष शिकलगार, शिवराज गावडे, मनिषा चौधरी, साक्षी देशपांडे, आयशा शेख, सोनल साळुंखे, जान्हवी वर्मा, ऐश्वर्या हनुमंत नवले, सीमा जाधव, शीतल पोळ, साहिल सुनील गुंड, दत्तात्रय होसराज काळे, शुभम भारत जाधव, विशाल मल्होत्रा, राकेश उत्तेकर, संतोष पातले, प्रणाली दत्ता सूर्यवंशी, अमन मुल्ला, सौरभ नवले, विनायक कदम, रोहित हाडके, तृप्ती निंबळे, धनश्री पाटील, परमानंद राम, जमीर शिकलगार यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले.
शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सत्कार्थींमध्ये शैक्षणिक क्षेञातील चंद्रशेखर कदम हे मनपाच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ३ खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त झाले असल्याने तर चिञपट क्षेञात महेश कोंडिबा कुडले, शाकीर शेख, इनायत शेख, सुशील भोसले, सीमा कुलकर्णी यांना MARATHON ZINDAGI हा चित्रपट वास्तविक जीवनातील अपंगांना घेऊन पूर्ण केला.चित्रपटास NASHIK INTERNATIONAL FILM FESTIVAL व DELHI INTERNATIONAL FILM FESTIVAL सर्वोत्तम चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला तसेच क्रीडा क्षेञात चेतन शिवाजी मुठाळ राष्ट्रीय स्तरावर किक बॉक्सिंग मध्ये तिसरा क्रमांक व राज्यस्तरीय स्पर्धमध्ये दुसरा क्रमांक मिळवून यश मिळवले आहे. तसेच आजपर्यंत एकूण ३-४ स्पर्धेत यश मिळविलेले, प्रथम प्राग भुजबळ से. २६, निगडी येथे झालेल्या लॉन टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी, वेदांत विजय भरेकर श्रीलंका येथे झालेल्या ज्युडो-कराटे स्पर्धेत सुवर्ण व रजत पदक प्राप्त व आफताब शिकलगार, ऋषिकेश सोनावले, सोहम उजगावकर, अर्ष शिकलगार, शिवराज गावडे, मनिषा चौधरी, हेतल शहा, साक्षी देशपांडे, आयशा शेख, सोनलसाळुंखे, जान्हवी वर्मा यांना राज्य थॉय बॉक्सिंग संघटनेमार्फत राज्यस्तरीय थॉय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले असून आग्रा येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच जतीन गणेश आव्हाड यांना कोलकता येथे नॅशनल कमेटी ऑफ इंडिया नागरपूर यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.बँकॉक, पटाया, थायलंड येथे भरलेल्या ७ व्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कु. आव्हाड याने केले. या स्पर्धेत एकूण ३ प्रकारामध्ये ३ सुवर्ण पदक मिळवले आहे ऐश्वर्या हनुमंत नवले, सीमा जाधव, शीतल पोळ यांना पुणे विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांकविजयी साहिल सुनील गुंड, काळे दत्तात्रय होसराज जाधव शुभम भारत मल्होत्रा विशाल विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी राकेश उत्तेकर बॉक्सिंग क्रीडा प्रकारात विविध स्पर्धा जिंकून विशेष यश. संतोष पातले किक बॉक्सिंगमध्ये ब्रांझ पदक प्राप्त. प्रणाली दत्ता सूर्यवंशी तेलंगणा येथे झालेल्या ६२ व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये ओपन साईट या क्रीडा प्रकारामध्ये वैयक्तिक व सांघिक गटात सुवर्ण पदक मिळवले आहे अमन मुल्ला सौरभ नवले विनायक कदम रोहित धडके विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नॅशनल व इंटरनॅशनल स्तरावर पदकं विजेते.