पिंपरी : निगडी येथील कॅम्प एज्युकेशन कॉलेज शेजारी असलेल्या नियोजित महापौर निवासस्थान मैदान येथे डायबेटिस व सांधेदुखी मुक्त शहर या संकल्पनेवर आयोजित नमस्कार महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
दररोज फन फेअरमध्ये विविध बचत गट, सेवा संस्था व शेतकरी गटाचे प्रदर्शन व विक्री, मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर, आयुर्वेदाच्या प्रसार व प्रचार अभियान, प्रदूषण व पर्यावरणविषयक जनजागृती अभियान, सेंद्रिय शेती विषयक व्याख्यान झाले. तसेच तपासणी शिबिर व पंचकर्म उपचार शिबिर घेण्यात आले. 530 जणांची तपसणी करण्यात आली . रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. या महोत्सवानिमित्त संध्याकाळी 7 वाजत भजन ठेवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध कलागुण सादर केले.
अभिनेता पुष्कर श्रोत्री प्रमुख भूमिका असलेले हसवा फसवी या नाटकाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रकाश वसइकर यांनी विनोदी कॅफे पार्क हे विनोदी एकपात्री नाटक सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष राजू मिसाळ, निमंत्रक निलेश पांढरकर, उत्सवसमिती प्रमुख सलीम शिकलगार, अतुल भोंडवे, इरफान मुजावर, रमेश हिंगे, मुन्ना बेग, उज्वला केळकर, राधिका बोर्लिकर, राजीव कुटे यांनी परिश्रम घेतले.