पिंपरी : आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर माजी सैनिकाच्या हाताला काम देण्यासाठी सदर्न कमांड पुणेच्यावतीने संगमवाडी येथील बाँम्बे सॅपर्सच्या आवारात माजी सैनिकाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी सदर्न कमांडचे प्रमुख पी. एम. हॅरिस यांची उपस्थिती होती.
दरवर्षी आर्मी डे चे औचित्य साधुन सदर्न कमांडच्या विविध रेजिंमेटमध्ये अशा मेळाव्याचे आयोजन केल जाते. आर्मीत वयाच्या 30 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत सेवा केल्यानतंर त्यांना इतर कंपन्याच्या सेवेत काम करण्याची संधी या निमित्ताने दिली जाते. यावेळी बँकिगपासून ते आयटी क्षेत्रातील कंपन्या या ठिकाणी आल्या होत्या. माजी सैनिकांनी या स्टॉल्सना भेट दिली आणि नोकरीविषयी माहिती घेतली.
दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नीचा गौरवही करण्यात आला. तर अपंग सैनिकांना व्हिलचेअर, दुचाकीचे वाटप सदर्न कमांडचे प्रमुख पी. एम. हॅरिश यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाँम्बे सॅपर्सच्या जवानांनी मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर केली. माजी सैनिकांना आधार देण्याचे त्यांना विविध सेवा देण्यासाठी आर्मी स्टाफ नेहमीच तत्पर असल्याचे मत पी. एम. हॅरिश यांनी यावेळी व्यक्त केले.