दिनांक १९/०१/२०१७ वार गुरुवार रोजी प्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडांगण आखून सुशोभित करण्यात आले. तसेच आकर्षक अशी रांगोळीचे रेखाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्म अ. मा.पाटील महाविद्यालय चे शिक्षक श्री. ए.बी.मराठे सर (जि.उपाध्यक्ष अंनिस,)होते. सदर कार्यक्रमासाठी पहिलीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना मान वंदना देऊन स्वागत केले.मान वंदनेसाठी पहिलीचा विद्यार्थी प्रणव भदाणे याने लिडिंग केले. तदनंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य श्री.गावित सरांनी केले. याप्रसंगी स्कूल चे व्यवस्थापक श्री.राहुल अहिरे सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. अनिता पाटील यांनी केले. त्याचबरोबर सरस्वती पूजन व क्रीडांगण पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे श्री.ए.बी.मराठे सरांनी आपल्या भाषणात मुलांना खेळाचे महत्व पटवून सांगितले. UKG व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पाटील मॅडमच्या मार्गदर्शनाने मार्च पास करून सर्वांचे मन मोहून घेतले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटवण्यात आली व पहिलीचा विद्यार्थी प्रणव भदाणे याने खेळाच्या मैदानाला क्रीडाज्योत घेऊन फेरी मारली. प्रमुख पाहुण्यांनी हिरवा झेंडा दाखवून खेळांना सुरुवात केली. त्यात १००मीटर धावणे, लिंबू चमचा, बुक बँलेन्स, संगीत खुर्ची, इत्यादी खेळ घेण्यात आले. स्पर्धांचे परीक्षण श्रीमती.पूनम तवर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना स्वीट व चॉकलेट चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृशाली भदाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमसाठी श्रीमती.अहिररावमॅडम, श्रीमती.माधुरी सैदाणे,श्रीमती.निलीमा देसले यांनी सहकार्य केले. संगीता कोठावदे व जयेश घरटे यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here