पिंपरी चिंचवड : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी एका तरुणावर कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अमित सुभाष पोटे (२५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर मयूर लोखंडे, पंकज जगताप, किशोर इंगळे आणि जैद मुजावर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सूरज दिलीप जगताप (२५, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री आकराच्या सुमारास चिंचवडेनगर ते लक्ष्मीनगर दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल असलेल्यांचा अमित हा मित्र होता. मात्र गेली आठ दहा महीने यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद होता. शनिवारी रात्री देवीची आरती झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन अमित यांच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना रविवारी त्याचा मृत्यू झाला. तपास चिंचवड पोलिस करत आहेत.