पिंपरी :- जाधव हे निगडी वाहतूक विभागात कर्तव्यावर आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते निगडीतील टिळक चौकात नाकाबंदी करीत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आरोपी चव्हाण याच्या एमएच – १४ – जी वाय – १७१९ या मोटारीस पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, आरोपी चव्हाण याने मोटारीची गती कमी केली नाही. त्याला थांबण्याचा इशारा करण्यासाठी जाधव हे पुढे आले असता चव्हाण याने त्यांच्या अंगावर मोटार घातली. मोटारीसह त्यांना फरफटत नेत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आरोपी चव्हाण याची मग्रुरी थांबली नाही.

मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. तुम्ही माझीच गाडी का अडविली? तुम्ही आमच्यावर दादागिरी करताय, तुमची गुंडशाही चालली आहे. मी लगेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलवितो. मग, तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी देत पुन्हा तो पोलिसांच्या अंगावर धावून आला.

हा प्रकार बुधवारी (दि. १६) रोजी निगडी येथे घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. अनिल नामदेव चव्हाण (वय ४०, रा. संस्कृती हाईटस्, शिंदेवस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय विष्णू जाधव (वय ५४) असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here