पिंपर – विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री अमित गोरखे यांनी मतदानाचा हक्का बजाविला. त्यांनी आई पिंपरी-चिंचवड महापालिका नगरसेविका अनुराधाताई गोरखे आणि पत्नी डॉ. प्रिया गोरखे यांच्यासह मतदान केंद्रावर जावून आपला मतदानाचा हक्का बजावला. संविधानानुसार मतदान हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक असल्याने समाजातील सर्वांनी निवडणुकीत अधिकाधिक मतदान करणे आवश्यक असल्याचेही अमित गोरखे यावेळी म्हटले.