नवी दिल्ली – जगातील वेगवेगळ्या देशात विविध भाषा बोलल्या जातात. मात्र भारतात बोलणाऱ्या हिंदी भाषेने आपली छाप अमेरिकेत उमटवली आहे. आता अमेरिकेत हिंदी ही भाषा सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरली आहे. या पाठोपाठाचं गुजराती आणि तेलुगु भाषेने देखील छाप उमटली आहे. अमेरिकेत १ जुलै २०१८ पर्यंत हिंदी भाषा बोलणारे लोक ८.७४ लाख इतके आढळले आहेत. त्यामध्ये २०१७ च्या तुलनेत १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे २०१८’च्या आकेडवारीनुसार ६.७३ कोटी निवासी लोक आहेत. त्यामधील लोक आपल्या घरांमध्ये इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणारे दिसून आले आहेत.
हिंदी भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत २०१० नंतर तब्बल ४३.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसंच हिंदी भाषेसह अमेरिकेत तेलुगु भाषा देखील सर्वात जास्त बोलणारी दुसरी भाषा आहे. तेलुगु भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत देखील २०१० ते २०१८ दरम्यान ७९.५ टक्के वाढ झाली आहे. तर गुजराती बोलणाऱ्यांची संख्या ४.१९ लाख आहे. गतवर्षीच्या तुलनेत ती ३.५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
तसंच १ जुलै २०१८ पर्यंत तामिळ बोलणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण ३.०८ लाख आहे. त्यामध्ये पुन्हा ६७.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तामिळ बोलणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशियाच्या नागरिकांचा समावेश आहे.
अमेरिकेत २१.९ टक्के लोक घरात एक परदेशी भाषा बोलतात. ‘अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे २०१८’च्या अहवालानुसार २० लाखांहून अधिक लोक हे हिंदुस्थानी आहेत. तसंच यामध्ये बंगाली भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण देखील ३.७५ लाख आहे. अमेरिकेत अन्य देशांतील व्यक्तीही बंगाली भाषा बोलत असतात. त्यामुळे सध्या अमेरिकेत हळूहळू भारतीय भाषेचा प्रभाव वाढताना दिसत आहे.