पिंपरी :- पिंपरी-चिंचवड अँडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनकर ज्ञानेश्वर बारणे यांची, तर अतुल अडसरे याची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बुधवारी (दि. ६) रोजी मोरवाडी न्यायालयाच्या आवारात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी अँड. बारणे आणि अँड. सुरेंद्र शर्मा यांच्यात लढत झाली. त्यामध्ये अॅड. बारणे हे विजयी झाले.

असोसिएशनची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अॅड हर्षल नढे ( सचिव ), अॅड सुजाता बिडकर (महिला सचिव), अॅड पूनम राऊत (सहसचिव अँड सुजाता कुलकर्णी (हिशोब तपासनीस), अॅड सागर अडागे, ( खजिनदार ), अॅड विश्वेश्वर काळजे, अॅड हरीश भोसरे, अॅड अनिल पवार, अँड. अजित खराडे, अॅड राजेश रणपिसे (कार्यकारिणी सदस्य) यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्षाच्या समितीने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here