पिंपळनेर – येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये गुरुवार दि. १४ नाव्हेंबर रोजी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. समन्वयक राहुल पाटील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्राचार्या लाडे यांनी बालदिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रसंगी, युकेजी ते ४ थी मधील विद्यार्थ्यांनी नेहरू यांचे लहान मुलांवर असलेले प्रेम बोलक्या शब्दातून व्यक्त केले. तसेच, पुजा मॅडम यांनी पंडित नेहरू यांच्या महाविद्यालयीन जीवनातील गोष्टींचे वर्णन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आश्विनी मोरे यांनी केले. तर, अर्चना देसले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पल्लवी मॅडम आणि अस्मिता मॅडम यांनी सुंदर रांगोळी रेखाटन केले. तसेच, फलक लेखन आश्विनी पगार व अनिता पाटील यांनी केले.