पिंपरी चिंचवड – दापोडी येथील दुर्घटना घडण्यासाठी ठेकेदार जबाबदार असून त्याला काळ्या यादीत टाकावे. त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि प्रभाग क्रमांक 30 मधील उपभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची बदली करावी, अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.

त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 1 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 30 मध्ये दुर्दैवी घटना घडली. यात दोन कर्मचा-यांना आपले प्राण गमवावे लागले. अमृत योजनेबाबत कसलीच चर्चा केली जात नाही. माहिती अधिकारमार्फत माहिती मागविली असता देण्यात आली नाही, असेही शेंडगे यांनी म्हटले आहेत.

दापोडी येथील खोदकाम करत असताना कर्मचा-यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली गेली नव्हती. अत्यंत बेजबाबदारपणे हे काम केले जात होते. या घटनेची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्यात यादीत टाकण्यात यावे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेंडगे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here