पिंपरी | घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 1 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना रविवारी (दि. 8) निगडी प्राधिकरण येथे सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. सुनीत गोपीनाथ चेट्टी (वय 42, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण मधील पेठ क्रमांक 27 मध्ये प्रणव व्हिला हा बंगला आहे. शनिवारी (दि. 7) रात्री साडेअकरा ते रविवारी (दि. 8) सकाळी साडेसात या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातून 64.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तीन हजर रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.