पिंपरी :- चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात येत्या रविवारी (दि.१५) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संयोजक राजू शिवतरे यांनी दिली.

 ४५८ व्या श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला शनिवार पासून देऊळमळा पटांगणावर सुरुवात झाली आहे. १७ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव आहे. या महोत्सवानिमित्त रविवारी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे. अॅड. सुनील आवारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.  संयोजक राजू शिवतरे म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. त्यामुळे वर्षांतून एकदा तरी रक्तदान करावे. शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here