पिंपरी चिंचवड (दि.१६ ऑक्टो २०१९) : सांगवी येथे बारी समाज विकास मंडळ, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उपवर-वधु मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात शनिवार रोजी झालेल्या या राज्यस्तरीय मेळाव्यात ७०० हून अधिक विवाहच्छुक युवक-युवतींनी परिचय दिला. या मेळाव्यासाठी पुणे शहर- जिल्हा, मुंबई, ठाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार (खान्देश), औरंगाबाद, नाशिक, अमरावती, खामगाव, विदर्भ, मराठवाड्यातून मोठ्या संख्येंने समाजबांधव सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चना हागे तर प्रमुख पाहुण्या म्हणून शुभांगी बनसोडे, उषाताई गुजर या उपस्थित होत्या. मंडळाच्या अध्यक्षा जयश्री पाटील यांनी मंडळाच्या कामाचा आढावा घेतांना त्या म्हणाल्या, वधू-वर परिचय मेळावे ही आजच्या काळाची गरज आहे. मुलांप्रमाणे मुलींसुद्धा उच्चशिक्षण घेऊन प्रगती करत आहेत, पुढे जात आहेत. त्यामुळे दोघांनाही आपल्या जोडीदाराची सोयीस्कर माहिती मिळावी, या उद्देशाने मेळावा घेण्यात येतो. समाज एकत्र आल्याने आणि परिचयातून होणाऱ्या लग्नांची विश्वासार्हता वाढते. यात समाजाच्या प्रगतीची चुणूक बघावयास मिळते. पुण्यामध्ये अनेक उपवर युवक आणि युवती नोकरी, व्यवसायाच्यानिमीत्त स्थिर होऊ इच्छितात. त्यांना आपला जोडीदार स्वतःच्या क्षमतेचा मिळावा, समकक्ष मिळावा ही त्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा बारी समाजाच्या मेळाव्यातून पूर्ण होताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी, बळीराम नागपुरे, चैतन्य बेले, कृष्णा पाटील, बाळकृष्ण बारी, संजय पोकळे, सुनीता बारी, सुरेश बोडखे, योगराज चौधरी, महादेव डकरे, राजेंद्र तांबोळी. योगेश पाटील, भानुदास दाभाडे, नितीन दुधे, राहुल पोकळे, प्रशांत बारी, संजय पोकळे, राजेंद्र काटोले, प्रल्हाद हागे, राजेंद्र बनसोडे, संतोष तोटे, दिनेश बनसोडे, राजेंद्र काटोले, मधुसूदन गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव चंद्रकांत लावणे, कु.छाया ताडे, शितल बारी यांनी केले. राजेश ताडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here