साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये कथा-कथन स्पर्धा घेण्यात आली. शिशू गट, मोठा शिशू गट व पहिली या वर्गांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रा. मोहन गावित अध्यक्षस्थानी होते. अभियानासहित विविध बोधपूर्ण कथा या वेळी विद्यार्थ्यांनी सांगितल्या. शाळेचे प्रा. गावित व पूनम बिरारीस यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. मोहित बेंद्रे, दक्ष साबळे, लेकराज बिरारीस या विद्यार्थ्यांच्या कथा उत्कृष्ठ ठरल्या.
अनिता पाटील यांनी ‘गरुड व घुबड’ या बोधपूर्ण कथेचे या वेळी कथन केले. प्रा. गावित यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पूनम तंवर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना देसले यांनी आभार मानले. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांनी संयोजन केले. जयेश घरटे व संगीता कोठावदे यांनी सहकार्य केले.