पिंपरी :- आजच्या काळात सुरळीतपणे सेवानिवृत्त होणे हिच अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले. माहे डिसेंबर २०१९ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या २२ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. कै. मधुकर पवळे सभागृह, मनपा मुख्य इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या चारुशीला जोशी आदी उपस्थित होते.
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये पदाधिका-यां बरोबरच अधिकारी व कर्मचा-यांचे योगदानही महत्वाचे आहे. सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा त्यामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे असेही त्या म्हणाल्या.
महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज देशमुख, लेखाधिकारी सुरेश इप्पकायल, असिस्टंट मेट्रन रोहिणी गोडसे, मुख्याध्यापक पांडुरंग गायकवाड, वाहनचालक मधुकर केंद्रे, लॅब टेक्नीशियन संजय देठे, सहाय्यक शिक्षक उमा कुलकर्णी, उपशिक्षक सुवर्णा गोसावी, शिपाई मालती कोष्टी, सफाई कामगार अलका ढोबळे, रखवालदार मोहन कदम, रविंद्र सूर्यवंशी, सुभाष नाणेकर, महादेव करंजकर, फायरमन रामदास गाजरे, बजरंग पवार, आया शोभा तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये लेखाधिकारी प्रशांत झनकर, उपलेखापाल सुरेश पंजाबी, गटरकुली लाला वडमारे, विजय शिरसाठ आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. यावेळी आज निधन झालेल्या अ प्रभागातील मुख्य लिपिक अनिल थेऊरकर व आकुर्डी करसंकलन कार्यालयातील लिपिक तानाजी घाडगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.