Chaupher News
पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या विविध विकासकामांसाठी सुमारे ८२ कोटी ९८ लाख निधी खर्च करण्याची मान्यता स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज (बुधवार दि. 22) झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.
बोऱ्हाडेवाडी येथील गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत उभारण्यासाठी ११ कोटी ७५ लाख, आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.१४ दत्तवाडी, विठ्ठलवाडी, परिसर इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण सुधारणा सुधारण्यासाठी ३२ लाख, प्रभाग क्र.६मधील नाशिक हायवेच्या पुर्वेकडील भागात मलनि:सारण नलिकांच्या कामासाठी ३६ लाख, ड प्रभागातील नदीच्या बाजूला असलेल्या गुरूत्व वाहिनिच्या देखभालीसाठी ३८ लाख, किर्तीनगर, विनायकनगर, समर्थनगर, उर्वरित भागामध्ये ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभालीसाठी ४६ लाख, ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. २३ व २४ मध्ये येणऱ्या नाल्यातील ड्रेनेज लाईन स्थलांतरीत करण्यासाठी ६७ लाख, प्रभाग क्र.१४ मधील विवेक नगर, तुळजाई, भागातील डी.पी.रस्त्याचे मजबुतीकरण, सुधारणा, नूतणीकरण, क्रॉकीटीकरण करण्यासाठी ३ कोटी ३५ लाख, निगडी येथील से-२२ मधील विद्युत दाहिनीचे वार्षिक पद्धतीने चालन देखभालीसाठी ३४ लाख, प्रभाग क्र.१५ मधील मनपा इमारतीची देखभाल, दुरूस्तीची, फर्निचर २८ लाख, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा १८ मीटर रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसित करणे, तसेच या कामांतर्गत विद्युत विषयक कामांसाठी ७५ लाख, प्रभाग क्र. ५ गवळीनगर व सँडविक कॉलनी परीसरात बंद पाईप गटर व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ४७ लाख, सांगवी केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ३१ रामनगर, व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणांसाठी ४६ लाख, चिंचवड लिंकरोड बाजूकडील यशोपुरम, संत गार्डन व साई ग्रेस सोसायटी समोरील व एम्पायर ईस्टेट येथे उड्डाणपुलाखाली स्थापत्य विषयक कामांसाठी ९ कोटी २३ लाख, मैलाशुद्धीकरण केंद्र व पंपीग स्टेशन मधील विद्युत पुरवठा पूर्ववत करणे ८१ लाख, ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव उपविभाग वार्ड क्र.२३ मधील रस्त्यावरील रुंदीकरणातील व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत मंडळाचे लघुदाब/उच्चदाब खांब, तारा व फीडर पिलर हलविणेकामी येणाऱ्या २८ लाख, प्रभाग क्र.१४ मध्ये फुटपाथ, स्ट्रॉर्म वॉटर व इतर कामांसाठी २६ लाख, प्रभाग क्र.२७ रहाटणी श्रीनगर, नखातेनगर, साईसागरनगर परीसरामध्ये रस्ते क्रॉकीटिकरण १३ कोटी ४४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२ मधील गट नं. ६०६ आरक्षण १/४४६ येथे माध्यमिक शाळा इमारत, १२ कोटी
२८ लाख व तापकीरनगर, बळीराज कॉलनी व गावठाण येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरयासाठी ११ कोटी ६८ लाख, असा एकूण ८२ कोटी ९८ लाख निधी खर्च करण्याची मान्यता देण्यात आली.