Chaupher News
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पवनाथडी जत्रेचे आयोजन दिनांक ४ मार्च २०२० ते ८ मार्च २०२० अखेर करण्यात येणार असून सांगवी येथील नियोजितस्थळाची महापौर उषा उर्फ माई ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्या आरती चोंधे, सहा. आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सहा. समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे तसेच स्थापत्य, विदुयत व प्रभागातील संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी मैदानाची समक्ष पाहणी करून मैदानाचे सपाटीकरण, विदयुत व्यवस्था, कार्यक्रमाचा मंडप, साऊंड सिस्टीम, स्थापत्य, योग्य पाणी पुरवठा करण्याबाबत संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपआपली कामे पार पडण्याच्या सूचना दिल्या.