Chaupher News

कान्हे येथे रेल्वे रूळ ओलांडताना लोकलची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एका मूकबधिर महिलेचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. रेखा प्रकाश शेलार (वय २६, रा. बोरीवली, मावळ) असे मयत महिलेचे नाव आहे.

तळेगाव लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.११) दुपारी १२.५७ वाजण्याच्या सुमारास महिला आपल्या ४ वर्षाच्या मुलाला (मुलाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही) कान्हे येथे हॉस्पिटलला घेऊन निघाली होती. यावेळी पायी चालत रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना किलोमीटर नंबर १४८/२४ येथे पुण्याकडून लोणावळ्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या लोकल रेल्वेची धडक बसल्याने या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला मूकबधिर असल्याने तिला गाडीचा आवाज आला नसल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस पठाण मेजर पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here