Chaupher News
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात विविध विकास कामांसाठी सुमारे ३७ कोटी ७५ लाख निधी खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
प्रभाग क्र.२ जाधववाडी मधील गट नं ५३९ विकसित करणेकामी ११ कोटी ९६ लाख, शिक्षण विभागाच्या बालवाड्यांसाठी स्कूल डेस्क खरेदीसाठी १ कोटी ८६ लाख ,२ ऑक्टोंबर २०१४ पासून केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. संपुर्ण देशभर केंद्र शासनामार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० राबविण्यात येणार असुन त्यादृष्टीने नागरीकांमध्ये जनजागृती, माहिती व प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेस येणाऱ्या १ कोटी ५३ लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपाचे आरोग्य विभागास आवश्यक औषध खरेदीकामी २८ लाख ,क्रिडा विभागास विविध व्यायाम शाळांकरीता आवश्यक विविध व्यायामशाळा साहित्य खरेदीकामी १ कोटी २१ लाख, ई क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. ३ मधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक दुरूस्ती ठेकेदारी पद्धतीने देखभाल व दुरूस्ती करणेकामी २७ लाख, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.६ ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक दुरूस्ती, ४० लाख, मनपाच्या से.२३ पंपहाऊस पंपिग मशिनरीचे व डिझेल जनरेटरचे देखभाल दुरूस्ती ३७ लाख, प्रभाग क्र. ५ मधील भोसरी आळंदी रस्ता सुशोभिकरण व स्थापत्य विषयक कामे ६४ लाख, चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील उर्वरित भागात मलनि:सारण विषयक कामे ५० लाख, क क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नाल्यातील अस्तित्वात असलेली ड्रेनेज लाईन रस्त्यावर स्थलांतरित करणेकामी ७६ लाख प्रभाग क्र. ८ ड्रेनेज लाईन जलनि:सारण नलिका टाकणे व दुरूस्ती ९१ लाख खर्चास, प्रभाग क्र. २७ रहाटणी मधील तापकीर चौक ते तापकीर मळा चौक परिसर व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्था सुधारणा ६१ लाख, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.८ मधील सेक्टर नं. ४ व ६ व उर्वरित भागात आवश्यकतेनुसार नविन ड्रेनेज लाईन टाकणेकामी २७ लाख, शिव शाहू शंभो उद्यानातील मोकळ्या जागेत जिम्नेशियम हॉल बांधणे व इतर स्थापत्य विषयक कामे २ कोटी ३९ लाख, पिंपरी चिंचवड मनपामार्फत नव्याने बांधणेत येणाऱ्या थेरगाव व चिंचवड येथील तालेरा रूग्णालय इमारतीसाठी आवश्यक क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (ETP) उभारणे ३ कोटी ६७ लाख रूपयांच्या प्रभाग क्र. २१ पिंपरी मधील तपोवन मंदिर परिसर, वैभवनगर, झुलेलाल घाट परिसर, डिलक्स चौक परिसर व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्था सुधारणा कामे ८३ लाख प्रभाग क्र. ३२ मध्ये सुआशी हॉटेल गल्ली, शिवाजी पार्क व उर्वरित परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेसाठी येणाऱ्या ४६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.