Chaupher News
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत.राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, घटलेली परकीय गुंतवणूक, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार सर्वसामान्यांना कसा दिलासा देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कालच राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधानसभेत सादर झाला. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला असून, महसूली तूट देखील मोठया प्रमाणात वाढली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राज्यावर चार लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करुन, विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करणे आव्हान असणार आहे.