चौफेर न्यूज – करोनाकाळात दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी (Board Exam 2023) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आलेली ‘शाळा तेथे केंद्रा’ची सुविधा यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत केंद्र मिळणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी पेपर लिहिण्यासाठी देण्यात आलेला अतिरिक्त कालावधीही काढून टाकण्यात आला आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे बदलण्यात येणार असून, जवळच्या शाळांमध्ये परीक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे. यंदाच्या परीक्षा करोनापूर्वीच्या पद्धतीनुसार पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना गेल्या वेळी 15 मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ देण्यात आला होता तोही यंदा रद्द करण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमांच्या आधारे होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पेपरफुटी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज
परीक्षेचे पेपर समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सकाळी पेपर असल्यास 10:30 वाजल्यानंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. दुपारच्या पेपरसाठी 02:30 नंतर केंद्रात घेतले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.