पुणे : 97 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली. नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये सावरकर यांची निवड करण्यात आली. आलेल्या अर्जांतील नावांवर चर्चा होऊन नियामक मंडळातर्फे अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.
नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीमध्ये जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली आहे. सात अर्ज नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे प्राप्त झाले होते. यामध्ये जयंत सावरकर, श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, बापू लिमये, प्रवीण कुलकर्णी, विनायक केळकर, प्रशांत दळवी अशा मान्यवरांचा समावेश होता. प्रशांत दळवी यांचे नाव सुचविणारा अर्ज सादर झाला. मात्र, त्यांचे संमतिपत्र नसल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला नाही. मुंबईत झालेल्या नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली आहे.