चौफेर न्यूज – परीक्षा, मार्क आणि वाढत्या प्रेशरमुळे मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावताना दिसून येतय. शिक्षणपद्धती आता प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. मुलाचं भविष्य हे त्यांच्या मार्कांवर अवलंबून असल्यासारखं पालक मुलांना वागवतात. परंतू ‘फन एंड लर्न’ या शिक्षण पध्दतीमुळे मुलाचं शिक्षण हे आनंदीत आणि सुखकर होणार आहे.
शिक्षण पद्धत जगभरात लोकप्रिय
‘फन एंड लर्न’ या संकल्पनेवर आधारित ‘जॉली फोनिक’ शिक्षण पद्धती लहान मुलांना प्री-स्कूल स्तरावर शिकवण्यासाठी जगभरात लोकप्रिय होत आहे. ‘फन एंड लर्न’ ही शाळा इंदूर शहरातील गोपूर येथे 2 वर्षापासून सुरु आहे. ‘जौली फोनिक’ ही शिक्षण पद्धती मोठ्या प्रमाणात प्रसिद्द होत असल्याने पालकाचं कल या शिक्षण पद्धतीकडे वळताना दिसून येतोय.
‘जॉली फोनिक‘ म्हणजे काय?
‘जॉली फोनिक’ ही अशी शिक्षण प्रणाली आहे. ज्यामध्ये 2 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांना फ्लॅश कार्ड, ध्वनी आणि बॉडी अॅक्शनद्वारे बोलणे आणि वाचणे शिकवले जाते. जेव्हा शिक्षक ‘B’ वर्णमाला दाखवतात, तेव्हा त्याच्या आवाजासोबत ‘B’ कृतीसह देखील सांगतात, ज्यामुळे मुले खेळत-खेळत अनेक शब्द वाचायला आणि बोलायला शिकतात.
मुलांना सामान्य एबीसीडी ( ABCD) शिक्षण देण्याऐवजी जॉली फोनिकद्वारे मुलांना वर्णमाला ज्ञान दिले जाते. येथे कला आणि विज्ञानाची ओळख एका खास पद्धतीने केली जाते. ज्याद्वारे मुले व्यावहारिक शिक्षण घेतात मुलांच्या मानसिक आणि शारीरिक सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाते. आपल्याकडेही मुलांना फ्लॅश कार्ड, ध्वनी आणि शरीर कृतीद्वारे बोलणे आणि वाचायला शिकवल्यास नक्कीच मुलांचा शिक्षणाकडे कल वाढेल आणि मुले उत्तम प्रकारे शिक्षण घेतील.