चौफेर न्यूज – आज दि. 24/12/22 रोजी प्रचिती पब्लिक स्कुल पिंपळनेर येथे ख्रिसमस (नाताळ) हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमाविषयी माहिती तसेच या सणाचे महत्व सांगण्यात आले.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिक्षा कोतकर यांनी केले. तसेच त्यांनी आजच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. आजच्या कार्यक्रमास श्री. राहुल पाटील सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तसेच प्रिंसिपल अनिता पाटील मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना नाताळ सणाविषयी मनोहर गोष्ट सांगितली. आजच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण शाळेत सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी क्रिसमस ट्री डेकोरेशन तसेच सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. आजच्या कार्यक्रमात यासमवेत सुंदर असे फलकलेखन करण्यात आले होते. आजच्या कार्यक्रमात विद्यार्थी हार्दिक कुवर याने सॅन्टा क्लॉज बनुन सर्वांचे मनोरंजन केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आजच्या कार्यक्रमासाठी काही विद्यार्थ्यांनी सॅन्टा क्लॉजच्या वेशभुषेमध्ये कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच मनस्वी राऊत या विद्यार्थिनीने नाताळ विषयी गीतगायन केले.
या कार्यक्रमांसाठी विद्यार्थिनींच्या डान्स ग्रुपने सुंदर असे नृत्य सादरीकरण करुन कार्यक्रमात बहार आणली. तसेच कार्यक्रमाच्या सरतेशेवटी विद्यार्थिनी स्वरुपा हीने नृत्य सादरीकरण केले व त्यानंतर स्कुलतर्फे सर्व विदयार्थांना चॉकलेटचे वितरण करण्यात आले व तसेच सरते शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.